महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.15:-मुलांच्या अंगी असलेल्या शारीरिक कला गुणांना तथा खेळ कौशल्यांना वाव मिळावा तसेच खेळाबद्दल आवडत निर्माण व्हावी या उद्देशाने येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ सौ माला प्रेमचंद यांच्या पुढाकाराने स्थानिक जिमच्या सहकार्याने पुरुष व महिला करिता नुकतेच भद्रावतीत वेट लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.माला प्रेमचंद होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिमचे स॑चालक अरविंद वाघमारे होते. सर्व प्रथम डॉ. माला प्रेमचंद यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून वेट लिफ्टिंग स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेत एकूण 60 पुरुष व महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धो पाच गटात घेण्यात आली.55किलो वजन पुरुष गटात प्रथम अमित शे॑डे, द्वितीय हिमा॑शु बोरीकर तृतीय क्रमांक प्रेयश मेश्राम. 60किलो वजन गटात प्रथम निहात अप्रेटवार , द्वितीय प्रज्वल पवार, तृतीय आशीष किन्हांके,65किलो वजन गटात प्रथम सुरज मेश्राम, द्वितीय गोलु चौ॑खे,तूतीय राहुल सातपुते, 74किलो वजन गटात प्रथम अमन पाटील, द्वितीय ऊत्कर्ष बा॑दुरकर,(तृतीय क्रमांक रोशन पोईनकर, खूल्या वजन गटात प्रथम अभिषेक वाढई , द्वितीय अनुप वाघमारे, तृतीय ‘अतुल आवळे, तसेच महिला च्या 48 किलो वजन गटात प्रथम आचल नैताम, द्वितीय मेघना वासाडे, तृतीय जया बारेकर,60 किलो वजन गटात प्रथम प्रेरणा रणदिवे, द्वितीय प्रगती वाघमारे या सर्व विजेत्यां स्पर्ध का॑चे डॉ.माला प्रेमचंद यांच्या शुभहस्ते मेडल्स व शील्ड देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सौरभ पाटील, राजु कोंडे, अमोल आवळे, अनुप वाघमारे, पवन लोढे यांनी सहकार्य केले.











