सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी :- उपविभागातील सर्वात रस्त्याची दुरवस्था असलेला मार्ग म्हणजे आलापल्ली – सिरोंचा मार्ग या मार्गावर ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडून आहेत. त्यामुळे या मार्गावर रहदारी करणाऱ्या नागरीकांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे.आलापल्ली सिरोंचा रस्त्यावर गेल्या आठवड्यात मोठे दोन ट्रक दोन्ही बाजूने रस्त्यावरील खड्डयात फसल्याने 5 ते 6 तास रस्ता बंद होता. दुसऱ्या दिवशी सुद्धा हा मार्ग बंद होता. त्यामुळे दुचाकी व इतर वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.सिरोंचा कडे जाणारी महामंडळाची बस सिरोंचा मार्गावर असलेल्या गोविंदगाव – येरागड्डा रस्त्यावरील खड्ड्यात बस फसल्यामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती, त्याचप्रमाणे प्रवासांना सुद्धा याचा फटका बसला आहे. काही तासांनी खड्डयात फसलेल्या बसला बराच प्रयत्नानी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.आलापल्ली ते सिरोंचा हा रस्ता जवळपास 100 किलोमीटर अंतरचा मार्ग आहे.या 100 किलोमीटर अंतरामध्ये अनेक ठिकाणी मोठं मोठे जीवघेणे खड्डे असून या खड्डयात अनेकदा चारचाकी वाहने फसून अनेक अपघात घडले आहेत.त्याप्रमाणे खड्यामुळे अनेक वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले आहेत.तसेच या मार्गावरिल जाणारे अनेक बसेस देखील फसल्या आहेत.या मार्गावर असे अनेक अपघात झालेले असुन या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.माञ प्रवाशांना कमालीचा ञास सहन करावा लागत आहे.पण दुर्दैवाने एखाद्या अपघातात प्रवासाचं जीव गेल्यास यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न यावेळीं सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनतकर यांनी व्यक्त केले आहे.


