समाधान पाटील
तालुका प्रतिनिधी चिखली
चिखली : सावखेड नागरे येथील ग्रामसेवक संतोष मोरे यांच्या चिखलीतिल घर चोरट्यांनी फोडून त्यांनी रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला मारला. एकूण 73 हजार रुपयांची ही चोरी झाली आहे. मोरे यांनी चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष प्रकाश मोरे 34 राहणार अंत्रि खेडेकर तालुका चिखली हल्ली मुक्काम हरी ओम नगर वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक 24 चिखली हे पत्नी दोन मुली सह सुनील नर्सिंग जाधव यांच्या घरात मागील सहा वर्षांपासून भाड्याने राहतात भावजयची डिलिव्हरी झाल्याने ते चिखली वरून लव्हाळा येथे पाचवी च्या कार्यक्रमाला 11 सप्टेंबरला गेले होते तिथून ते सायंकाळी साखरखेर्डा येथे सासरवाडीला गे ले दुसऱ्या दिवशी 12 सप्टेंबरला सकाळी साडेसहाला शेजारी उमेश सोमला राठोड यांचा त्यांच्या त्यांना फोन आला त्यांनी सांगितले की तुमच्या घराच्या कुलूप कडी कोंडा तुटलेला दिसत आहे त्यामुळे घाबरलेल्या मोरे यांनी तातडीने कुटुंबासह घर गाठले. घरात पाहणी केली असता डायनिंग हॉल मधील कपडे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले बेडरूममधील लोखंडी कपाट उघडे दिसले कपाटातून रोक 18000 रुपये सहा वस्तू सोन्याच्या अंगठ्या सोन्याचे तीन ओम सोन्याचे धम्मचक्र सोन्याचे गौतम बुद्धांचे लॉकेट असा एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल गेल्याने दिसून आले चोरीस गेल्याचे दिसून आले पुढचा तपास चिखली पोलिस करीत आहे.











