गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील गाडेगाव येथे एका 35 वर्षीय भूमिहीन शेतमजुराने दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना आज ता 14 सप्टेंबर मंगळवारी 12 वाजताचे दरम्यान घडली आहे. प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी प्रकाश सदाशिव सोनोने वय 35 वर्ष या भूमिहीन शेतमजुराने आप्पासाहेब मुंजे यांच्या गायवाड्यात दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ जगदीश पुंडकर व पोकॉ सतीश भटकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे पाठविला असून वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते.











