महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१४:-मुंबई आणि पुणे येथे नुकत्याच झालेल्या महिलावरील अत्याचाराच्या घटनांचा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.मुंबई मध्ये महिलेवर झालेला अत्याार व पुणे येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर विविध ठिकाणी नेऊन आळीपाळीने सामुहिक अत्याचार करण्यात आले. या दोन्ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणा-या आहेत. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच्यातून शासनाच्या सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. महिला अत्याचाराचे प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहिले तर लोकांचा कायदा आणि सुव्यस्थेवरील विश्वास उडेल. आज या दोन्ही घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भद्रावती शाखेने भद्रावती येथील आंबेडकर चौकात जाहीर निषेध केला. या दरम्यान नगर मंत्री बाळा प्रशांत भडगरे, विद्यार्थिनी प्रमुख निविदिता मुजुमदार, यश चौधरी, तनुजा येरणे, साहिल नक्षिने, तन्मय भदभुजे, आकाश राखुंडे, संस्कार झाडे, मयूर भडगरे, दर्शना नागपुरे, भाग्यश्री भडगरे उपस्थित होते.