किरण कुमार निमकंडे जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.अमरावती विभागाचे अभ्यासू शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या वाढदिवस विशेष उपक्रमाने साजरा करण्यात आला. पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले.हा सप्ताह वृक्ष सवांर्धन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली या सप्ताहाचे उदघाट्न पार पडले. यावेळी शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे प्रामुख्याने उपस्थित होत्या. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, शीतल कवडकर, सुलभा परमाळे, नितु ढोणे, वंदना पोहरे, किरण दांडगे, जयेंद्र बोरकर, अश्विनी अंभोरे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.