गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी
नाशिक : मधील पंचवटी परिसरात असलेल्या भारत नगर ,होटेल जत्रा समोरिल परिसरात नाशिक महानगर पालिका ,आरोग्य विभाग (मलेरिया विभाग) यांनी करोना काळात उत्कृष्ट कामगिरी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेत हजर राहून जी मदत केली अशा अधिकारीवर्ग व कर्मचारीवर्ग यांना करोना योद्धा या सेवा पुरस्काराने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन तर्फे आयोजित करोना योद्धा पुरस्कार नगरसेवक श्री.सुरेश खेताड़े व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कडलग साहेब तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर ,नवनीत पाटिल विश्वास तांबे उत्तर महाराष्ट्र उपसचिव व शहर अध्यक्षा सुनीता जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या सत्कार समारंभा प्रसंगी सुरेशअण्णा मते ,संतोष जगताप व जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.