पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : विदर्भानंतर औसा तालुक्यात सर्वादिक शेतकरी आत्महत्त्या झालेले आहेत . या आत्महत्त्या आर्थिक विवंचनेतून झाल्या आहेत . औसा तालुक्यावर लागलेला हा मोठा डाग आहे . औसा मतदारसंघात फळबाग लागवडीसाठी मनरेगातून निधि उपलब्ध करुण देत येथील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करुण देऊन त्यांच्या अडचणी सोडविणे हेच माझे राजकरणाचे ध्येय असून मराठवाड्यातील सर्वात जास्त आत्महत्त्या केलेला हा तालुका फळबाग लागवडीत राज्याला आणि देशाला दिशा देणारा ठरेल . नुसती फळबाग लावड़ नाही तर त्यावर प्रक्रिया उद्योगाचीही उभरणी केली जाणार आहे . मनरेगाच्या उत्कृष्ट कामात देशात व राज्यात औसा हा पहिल्या क्रमांकावर येत असून जो पर्यन्त शेतकरी आर्थिकदृष्टया मजबुत होणार नाही तो पर्यन्त मी शेतकऱ्यांच्या बांध सोडनार नाही असे आमदार अभिमन्यु पवार म्हणाले . ते रविवारी औसा मतदारसंघतील 120 शेतकरी व कृषि अधिकाऱ्यांशी सवांद साधताना औशात बोलत होते . ते स्वतः शेतकाऱ्यांसोबत तीन दिवस अभ्यास दौऱ्यात सहभागी होते . त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने , उपविभागीय कृषी अधिकारी राजेद्र कदम , तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांचा समावेश होता . यावेळी बोलतांना आमदार पवार यांनी सांगितले की , औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रगतिसाठी मतदारसंघ गाव मानुन कामाला सुरुवात केली . पाणी विज आणि रस्ता ही शेतकऱ्यांच्या उन्नतीची त्रिसूची आहे .अवर्षण आणि दुष्काळामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला असताना या वातावरणात केशर आंबा आणि सीताफळ हे दोन फळझाडे चांगले येऊ शकतात हे ध्यानात आल्याने तालुक्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे त्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला असून या दौऱ्यात प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनी गावातील लोकांनाही शिकवावे अशी अपेक्षाही आमदार पवार यांनी व्यक्त केली .











