गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : स्थानिक माहेश्वरी भवन येथे आयोजित तेल्हारा विकास मंचच्या बैठकीमध्ये विकास मंच आगामी नगरपालिका निवडणूक समाजातील प्रत्येक घटकासह बारा बलुतेदार व अठरा पगळ जातींना सोबत घेऊन लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून बैठकीत मार्गदर्शक सल्लागार समिति व प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.तेल्हारा विकास मंच ची बैठक मार्गदर्शक गजानन रेवस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून बैठकीमध्ये मार्गरदर्शक सल्लागार समिती गठित करण्यात आली या मध्ये माजी नगरसेवक देवीदास भुजबले , गजानन रेवस्कर .प्रा. कृष्णा फंदाट ,भावराव वानखड़े गुरुजी .दिपक दही गुरुजी. सुरेशआप्पा घोडेस्वार.अशोक खारोडे .सदाशिव वाघ .श्रीराम सूरे ,हुसेन खाँ आलम खाँ ,देवीदास तायड़े .सुरेश मंत्री .हरीश जिंदे ,संतोष राठी .अरविंद फाड़के,रामदास खारोडे .सैय्यद इसा सैयद मुसा ,प्रकाश सोनटक्के ,सदानंद पिंपळकार ,सुरेश सोनोने ,राजुभाऊ वानखड़े .विनोद पोहरकार , संदीप मामनकार ,सुशील तायड़े, रामेश्वर हागे ,शब्बीर शाह इसुब शाह ,अमीर खाँ गफ्फार खाँ , शे मुस्ताक , विराग खाँ गुलाब खाँ यांची मार्गरदर्शक समिति गठित करण्यात आली असून तेल्हारा विकास मंचच्या उपाध्यक्षपदी कुशल संघटक प्रवीण पोहरकार ,सरचिटणीसपदी स्वप्नील सुरे तर संघटक पदी शेख ताजुद्दीन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे विकास मंचच्या अनु. जमाती आघाडीच्या अध्यक्ष पदी विलास पवार यांची निवड करण्यात आली यावेळी विकास मंच सर्वाना सोबत घेवून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरनार असल्याचे विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी जाहिर केले आभार मंचचे उपाध्यक्ष प्रवीण पोहरकार यांनी मानले बैठकीला युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के तसेच मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आगामी पालिका निवडणुकीत दुहेरी मतदानाचा दुरुपयोग कसा टाळता येणार, वार्डनिहाय संघटनात्मक बांधनी पैशाचा फंडा निस्तानाबुद करण्यासाठी व्यूहरचना आखून जनजागृती करण्यावर तेल्हारा विकास मंच भर देणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले .
रामभाऊ फाटकर तेल्हारा