सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : समाजक्रांती परिवार मेहकर संस्थापक साहयक गट विकास अधिकारी गजानन पाटोळे यांचा १२ सप्टेबर जन्मदिवस व योगायोग गौरी गणपतीचे आगमन सर्वत्र होत असतांना अश्या मंगल समयी जन्मदिवस येणे म्हणजे योगायोग म्हणावा लागेल.अश्या पवित्र मंगल वातावरणामध्ये सर्वांकडेच सणवार समाधानकारक साजरे व्हावेत ही माफक अपेक्षा गजानन पाटोळे यांनी व्यक्त करून जन्मदिवस चे निमत्त साधून ग्राम मोहतखेड ता.लोणार येथील निराधार महिला श्रीमती उषाबाई शंकर धावडे यांना परिवाराच्या वतीने ५१००/- (पाच हजार शंभर रुपये )चा आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला तसेच ग्राम उकळी ता.मेहकर येथील आत्महत्याग्रस्त खिल्लारे कुटुंबाला ७०००/- (सात हजार रुपये) आर्थिक आधार देण्यात आला.गजानन पाटोळे यांनी भावना व्यक्त केली की घरातील प्रमुख व्यक्ती गतप्राण झाल्याने कुटुंबाची होणारी दयनीय अवस्था मनाला बैचेन करणारी असते.तीच परिस्थिती खिल्लारे कुटुंबाकडे दुर्दैवाने आढळली त्यांना काहीसा आर्थिक आधार देणे गरजेचे त्यादृष्टीने समाजक्रांती परिवाराचा छोटासा प्रयत्न.जन्म दिवसांचे निमित्त साधून केला आहे.त्यावेळी उकळी गावचे सरपंच पती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर आर .के बोरे उपसरपंच पती दादाराव तुरुकमाने विभाग प्रमुख तथा ग्रापं सदस् गजानन पातळे विलास तुरुकमाने खिल्लारे je व ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे मेहकरचे तालुका अध्यक्ष परमेश्वर बोरे श्रीमती दुर्गाताई सपकाळ,श्रीमती रेखाताई गवई विजयाताई शिरलोढे या उमेद अभियानाच्या महिलांची उपस्थिती होती.











