किरणकुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : खानापूर रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी तुळसाबाई कावल विद्यालयाच्या पाचवी १९८२ चे माजी विद्यार्थ्यांनी राजेश काळकुळ यांच्या सुचनेनुसार घेऊन जीवघेण्या खड्ड्यांचा अडकलेला श्वास ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोकळा केला. काही दिवसापूर्वी पातुर तालुका विकास मंचाने विविध सामाजिक संस्था तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना व शहरातील नागरिकांना सोबत घेत श्रमदानातून या पातुर खानापूर रोडवरील पडलेले खड्डे स्वखर्चातून आणलेल्या मुरूमानी बुजवले होते परंतु दुस-याच दिवशी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यातील मुरूम वाहून गेला व त्या ठिकाणी शिल्लक राहिले ते मोठे मोठे दगड,या रस्त्यावर असलेल्या दगडांचा रस्त्यावरून ये-जा करणा-यां वाहनधारकांना त्रास होत होता त्यामुळे शहरात नव्याने उदयाला आलेले आणी समाजाचं आपल्याला काही देणं लागतं या उदात्त हेतूने प्रेरित होउन टिकेव्ही १९८२ ने शिर्ला ग्रामपंचायत च्या सरपंच यांच्याकडे याविषयी माहिती दिली.सरपंच महोदयांनी याचा गांभीर्याने विचार करून काही ग्रामपंचायत सदस्यांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बारीक मुरूम टाकून रोडवर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करून वाहन चालकांना दिलासा दिला.याच पद्धतीने संभाजी चौकातील रस्त्याची डागडुजी लवकरच करण्यात येईल. यामुळे टि के व्ही १९८२ या माजी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी पातुर पं.स.माजी सभापती बालू भाऊ उर्फ अनंता बगाडे,शिर्ला ग्रा.पं.सदस्य सागर कढोणे,सुनिल गावंडे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर शिंदे,चंद्रकांत अंधारे आणी टि के व्ही १९८२ पाचवीचे माजी विद्यार्थी तसेच पातुर तालुका विकास मंचाचे दिलीप इंगळे आणी दिलीप बगाडे, गणेश राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.











