गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील वाडी अदमपुर येथील 214 नागरिकांचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रपत्र यादीतील प्रपत्र ड यादीत समाविष्ट करून त्यांना लाभापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवणाऱ्या संबंधित दोषीची चौकशी .कार्यवाही व अन्याय्य ग्रस्त न्याय मिळावा .या प्रमुख मागणीसाठी वाडी अदमपुर चे माजी पोलिस पाटील शंकरराव भाकरे यांच्यासह 5 ग्रामस्थ 15 सप्टेंबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन वाडी अदमपुर बस थांब्यालगत बेमुदत उपोषनास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधकाऱ्यांसह संबंधितांना देण्यात आले आहे. तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपुर येथील घरकुल यादीतील घोळ प्रकरणातील चौकशी व गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या दोषिवर कायदेशीर कार्यवाही व्हावी. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला तडा देण्याचे व योजनांचे बट्ट्याबोळ ग्रामपंचायत कडून होत असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे 15 सप्टेंबर पासून न्याय मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसणाऱ्यामध्ये शंकर भाकरे , रघुनाथ घोराड , संजय खारोडे , योगेश वरणकार , गणेश वाघ सर्व राहणार वाडी अदमपुर ता.तेल्हारा यांचा समावेश आहे निवेदनाच्या प्रतीलीपी पालकमंत्री बच्चू कडू ,आमदार प्रकाश भारसाकळे .मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला .जिल्हा पोलिस अधीक्षक .तहसीलदार तेल्हारा , गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा. पोलिस निरीक्षक तेल्हारा यांना देण्यात आल्या आहेत











