जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर : समाजातील वंचित, गरजू आणि गरीब लोकांसाठी कार्य करणे आवश्यक असते. आदर्श कार्यपद्धतीमुळेच कलापंढरी संस्थेने समाजासाठी ३५ वर्ष समर्पित कार्य केले असे गौरोद्गार कलापंढरी मागासवर्गीय आणि आदिवासी ग्रामीण विकास संस्था, पानगाव जि.लातूर यांच्यावतीने दि.१० सप्टेंबर रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या डिजिटल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आनंदोत्सव व संकल्प दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयतील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे माजी प्रांतपाल रो.डॉ.विजयभाऊ राठी, क्राय, मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक कुमार नीलेन्दू, क्राय राज्यप्रमुख सौमिता दास, क्रायचे प्रकल्प व्यवस्थापक राम चंदर, माजी प्राचार्य डॉ.माधवराव गादेकर, नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा सुमती जगताप, कलापंढरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.पी.सूर्यवंशी, डॉ.संजय गवई आणि शिलाताई सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अपेक्षा वाघमारे यांनी संस्थेच्या कार्यावर स्वागत गीत सादर केले. पुढे बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले की, कलापंढरी संस्थेने आपल्या आई-वडिलांचा विचार आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील वंचितांची समर्पित भावनेने सेवा केली. कलापंढरीने सामाजिक बांधीलकी सोबत पारदर्शकता, मनुष्यबळाचा विधायक वापर, शासकीय यंत्रणेसोबत समन्वय, मार्गदर्शक मंडळीचे सक्रीय योगदान आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय व सकारात्मक सहभाग या सर्व गोष्टीमुळे कलापंढरी संस्था ही ३५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये वंचितांच्या विकासासाठी अग्रेसर असून भविष्यामध्ये या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रम व्हावा आणि त्या कार्यक्रमाला आम्हा सर्वांना निमंत्रित करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाज हितासाठी कलापंढरीने घेतलेल्या प्रत्येक उपक्रमाला आम्ही सर्व त्यांच्या सदैव सोबत असू असे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले. या कार्यक्रमामध्ये नारी प्रबोधन मंच, लातूर, बाल कल्याण समिती, लातूर, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन, राजर्षी शाहू बायोटेक्नॉलॉजी महाविद्यालय, लातूर आणि जिल्हयातील सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्ते आदिनी बी.पी.सूर्यवंशी व सर्व कलापंढरी परिवाराचा यथोचित सत्कार करून संस्थेच्या पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी क्राय संस्थेचे महाव्यवस्थापक कुमार नीलेन्दू म्हणाले की, रचनात्मक कार्यपद्धती, चोख हिशोब, तत्पर अहवाल देण्याचे कौशल्य यामुळे संस्थेस मागील २२ वर्षापासून सहकार्य करीत आहोत व यापुढेही सहकार्य केले जाईल असे ते म्हणाले. यावेळी रो.डॉ.विजयभाऊ राठी म्हणाले की, कलापंढरी संस्थेचे कार्य हे समाज उपयोगी आहे. लवकरच या संस्थेच्या सहकार्याने नॅब व रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनच्यावतीने २५ गावांमध्ये किशोरी गटातील मुलींसाठी सॅनिटरी पॅड व इन्सीनेटर मशिन मोफत वाटपाचा प्रकल्प राबविणार आहोत.अध्यक्षीय समारोप करताना डॉ.बाळासाहेब गोडबोले म्हणाले की, कलापंढरी परिवारामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे नियमित सहकार्य असते पुढेही भविष्यात समन्वयाने स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यासाठी विशिष्ट कालावधीचे अभ्यासक्रम तयार केले जातील असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.पी.सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार अनिरुद्ध जंगापल्ले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरज सुर्यवंशी, शिवदर्शन सदाकाळे, जयवंत जंगापल्ले, धनराज पवार, कुणाल जोशी, बाबासाहेब कांबळे, कीर्ती बणवस्कर, मधुकर गालफाडे, प्रतिमा कांबळे, अंजली कुलकर्णी, अक्षता सूर्यवंशी, अलका सन्मुखराव, सद्दाम शेख, बापू सूर्यवंशी, नादिर शेख, संजय पाटील, बालाजी सुरवसे, मारुती देवकते, अश्विनी मंदे, सुरेश हाके व संयम गवई यांनी परिश्रम घेतले.