गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती जळगाव जामोद संग्रामपुर च्या वतिने तेल्हारा येथिल रामदेवबाबा मंदिराला गणेश चतुर्थी व भादवा उत्सव च्या पावन पर्वावर पंचरंगी ध्वज लावून उत्सव साजरा करण्याचा संकल्प घेण्यात आला
श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती जलगाव जामोद, संग्रामपुर वरुन आलेल्या श्री रामदेवबाबा भक्ताचे तेल्हारा रामदेव बाबा युवा मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले विविध धार्मिक सामाजिक कार्यात दर्शन सेवा समिती अग्रेसर असते या वेळी जय बाबा कि च्या जय घोषाने तेल्हारा परिसर दनानले होते.श्री रामदेवबाबा युवा मंडळ व भक्त गन मोठ्या संख्येने उपस्थित होते