गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील रायखेड येथील सौ. सिमा गजानन वानखडे( वय ४५ ) विद्युत शाॅकलागुन मृत्यू झाल्यामुळे
ग्रामपंचायत रायखेड यांनी हि घटना घडण्याअगोदर संबंधित लाईनमन व कनिष्ठ अभियंता हे गावात वीजबिल वसुलीकरिता गावात असताना तार तुटल्याची माहिती गावकऱ्यांनी त्यांना दिली होती परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले. या आधी चार वर्षापासून त्यावरील न्युट्रल तार तुटलेला आहे तो सुद्धा आजपर्यंत जोडला गेलेला नाही. त्याबाबत सुद्धा अधिकारी व कर्मचार्याना माहिती दिली आहे परंतु अद्याप पर्यंतकुठलीही कार्यवाही झालेली नाही सदर लाईन वरील फ्युज बॉक्स मध्ये फ्युज नसल्याने डायरेक्ट जोडण्यात आले जर या मध्ये फ्युज असता तर विद्युत तार तुटली असता त्यामध्ये विद्युत करंट आला नसता व विद्युत अपघात होऊन ती बाई सीमा गजानन वानखडे (मयत) मरण पावली नसती रा रायखेड यांचा मृत्यू केवळ हा महावितरण कर्मचारी व संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी दुर्लक्ष केल्यामुळे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करीत आहेत.


