गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा नगर परिषद च्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान थांबविण्या बाबत मागणी करून सुद्धा पालिका चूक दुरुस्त करण्यास तयार नसल्यामुळे पुढे आंदोलन होऊन शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार राहतील अशा प्रकारचे निवेदन तेल्हारा विकास मंच युवक आघाडीच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना ९ सप्टेंबरला देण्यात आले. शहरामध्ये माँ जिजाऊ उद्यान तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान या उद्यानामध्ये दोन्ही प्रवेशद्वारावर लोखंडी पत्रा लावून जी नावे टाकन्यात आली ती इतर ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा खर्च करणाऱ्या नगरपालिकेला शोभून दिसत नाही तर दुसरीकडे महापुरुषांच्या प्रवेश द्वार अशाप्रकारे टिनपत्र्याने सजविले जातात ही एकप्रकारे त्या महापुरुषांची विटंबना नव्हे काय.तसेच नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे लहान अक्षरात नाव टाकण्यात आले आहे ते नाव टाकताना वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात नगर परिषद तेल्हारा असे लिहिले आहे त्यामुळे हा एक प्रकारे महापुरुषांचा अपमान होत आहे तरी नगरपरिषद ने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर जे नाव टाकण्यात आले आहे त्या नावांमध्ये बदल करून सर्वात वरच्या बाजूला मोठ्या अक्षरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे लिहावे आपण जर आमच्या मागणीचा विचार करून आठ दिवसाच्या आत काही निर्णय न घेतल्यास नगर परिषद अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून महापुरुषांची विटंबना होत आहे असे गृहीत धरून आम्ही आंदोलन करू असा इशारा नगर परिषद ला ८ दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनामध्ये केला होता. यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बद्दल सुद्धा नावा बद्दल निवेदन देऊन मांगणी केली होती आठ दिवस झाल्यानंतर नगरपरिषदेने सदर मांगनी ची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पुढे महापुरुषांच्या नावाबद्दल व त्यांच्या होत असलेल्या अपमनाबद्दल नगरपालिकेमध्ये आम्ही आंदोलन केल्यास व शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार राहतिल असे निवेदन विकास मंच युवक आघाडीच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना देण्यात आले आहे. यावेळी विकास मंच युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के , स्वप्निल सुरे ,नितीन मानकर, विठ्ठल मामनकर ,नितिन मानकर , निलेश मानकर, विजय रोडगे रविंद्र वाडेकर अक्षय सुरे आदी उपस्थित होते निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना देण्यात आले आहे.


