किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : पंचायत समिती येथील बचत भवन येथे सात सप्टेंबर रोजी पातुर तालुक्यातील शासकीय विभागाचे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला आमदार नितीनबाप्पु देशमुख, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी,तहसीलदार दीपक बाजड व पंचायत समिती सभापती सौ.डाखोरे उपस्थित होत्या या दरम्यान रोजगार हमी योजना, सिंचन विहीर जलसंधारण विभाग, तालुका क्रीडा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, आरोग्य विभाग चतारी ,जिल्हा परिषद लघु सिंचन ,आरोग्य विभाग पातुर, पाणीपुरवठा ,रेशीम उद्योग ,महसूल विभाग, सामाजिक वनीकरण, मानव विकास योजना, कृषी विभाग, भुमिअभिलेख खाते, पातुर पोलीस स्टेशन, चान्नी पोलीस स्टेशन असे सर्व विभागाचे गेल्या वर्षात प्रत्येक विभागाने काय काय कामं केले याबाबत विचारणा करण्यात आली. व पातुर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात सर्व अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे असे निर्देश संबंधीत अधिकार्यांना आमदार देशमुख यांनी दिले या बैठीकीला शहर प्रमुख अजय ढोणे , अरुन कचाले सह अधीकारी उपस्थीत हौते


