अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तालुक्यातील दी.पी.ई. एस. विद्यालय पिंपळखुटा येथे 18 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास उर्वरित शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांना परत द्यावा असे राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिले असताना सुद्धा सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप चव्हाण व शिपाई सुरेश खोडके यांना तांदूळ चोरी करून नेताना सर्व गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते.व ह्या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण सुद्धा करण्यात आले होते.ह्या प्रकरणी सदर मुख्याध्यापक व शिपाई ह्यांच्यावर फोजदारी कार्यवाही करण्यासाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला द्वारा निवेदन देण्यात आले होते.व जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या नेतृत्वात मागणीसाठी 9 ऑक्टोबर 2020 रोजी ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.व ह्याआधी झालेली चौकशी संपूर्णपणे खोटी असून परत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.ह्या सर्व घटनेची गांभीर्याने दाखल तर घेतली व शिक्षणाधिकारी वैशाली ठग मॅडम प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हापरिषद अकोला ह्यांनी दुबार चौकशी करिता त्रिसदस्यीय चौकशी समिती 26 फेब्रुवारी 2021 रोजी गठीत केली होती असून चौकशी समितीमध्ये रतनसिंग पवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शी टाकळी,मनोज गवई अधीक्षक पं. स.मूर्तिजापूर व अलिम देशमुख विस्तार अधिकारी जि. प.प्राथमिक शिक्षण विभाग अकोला ही उच्च विभूषित त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. परंतु गेल्या सात महिन्यापासून ह्या त्रिसदस्यीय समितीला चौकशी करिता मुहूर्तच सापडला नाही त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग ह्यांनी सुधा त्यावर कुठल्याही प्रकारची विचारणा सुद्धा केली नाही. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद पुर्णपणे खोट्या व भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची पाठराखण करत असून त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचार फोफावला असून त्यामुळे चुकी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन साटेलोटे करून प्रकरण दडपणे हा सरसकट चाललेला प्रकार असून विद्यार्थ्यांचे नावावर येणाऱ्या योजनांचा मलिदा लाटून विद्यार्थ्यांच्या टाळू वरचे लोणी खाणारे सक्रिय झाले असल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी केला आहे हे आम्ही खपवून घेणार नसून सर्वांना नीट करण्याची आम्ही तयारी करत आहोत असा सजक इशारा सुद्धा दिला आहे व सदर प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.


