पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : अंधानेर तालुका कन्नड येथे दिनांक 7 सप्टेंबर 2021 दिवसभर व रात्री प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे अंधानेर येथील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे जमीन वाहून गेली असून काही शेतकऱ्यांचे कपाशी आद्रक मक्का टोमॅटो कोबी भुईमूग व इतर पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेले आहे या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची व पिकाची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते तहसीलदार संजय वारकड तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी संपूर्ण पिकाचे जमिनीची पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा करून झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना दिले तात्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या जमिनीचे पिकांचे पंचनामा करून नुकसानीचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले यावेळी सरपंच अशोकराव दाबके ग्रामविकास अधिकारी एम डब्ल्यू पगारे तलाठी चव्हाण आप्पा कृषी सहाय्यक गुरव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पांडे, रशीद शेख ,गोरख करवंदे ,कृष्णा काळे, ज्ञानेश्वर काळे ,लक्ष्मण काळे ,किसनराव काळे , कारभारी सोनवणे, शिवाजी बन, सुभाष काळे व इतर अनेक शेतकरी यांना उपविभागीय अधिकारी विधाते अतिवृष्टीमुळे झालेल्या जमिनीचे व पिकांचे नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.


