महेश बरगे तालुका प्रतिनिधी अंबड
अंबड दि.10 आज गणेश चतुर्थी आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस .गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र उत्साहात जोरदार तयारी सुरू झाली आहे बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. यावर्षी प्रकर्षाने जाणवणारी एक बाब म्हणजे पारंपारिक आणि गणेश मूर्तींना आणखी सजवून वेगळ्या रूपाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या पेणच्या गणेशमूर्ती आहेतशासनाच्या बंधनामुळे बाजारांमध्ये चार फुटाच्या पेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नाहीत. आहेत त्याच मूर्तीमध्ये राम मंदिराचा देखावा, शंभू महादेवाचा देखावा ,बासरी वाजवणारा गणपती, विविध फेटे बांधलेला गणपती, अशा अनेक प्रकारच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विसर्जनासाठी सोप्या आणि पर्यावरणाला पूरक असलेल्या शाडू मातीपासून तयार केलेल्या देखील गणेश मूर्ती बाजारात असून यावर्षी राजस्थान येथून देखील लाल मातीच्या कोरीव काम केलेला गणेश मूर्ती आलेल्या आहेत. शाडू माती पेक्षाही या गणेश मुर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये लवकर विरघळतात असे सांगितले जात आहे.