सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : येथून जवळच असलेल्या अनसिंग येथे दिनांक 4/9 /2021रोजी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे न्हाविक समाजामार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान श्रेष्ठदान असल्यामुळे सदर रक्तदान शिबिरास गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले सदर शिबिरात रक्तदान केलेल्या नागरिकांना अनसिंग येथील पोलीस स्टेशनच्या ठाणेदार नयना पोहेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता समस्त न्हाविक समाज यांनी परिश्रम घेतले