अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
मोरगाव भाकरे : गट ग्रामपंचायत येथे मागील कित्येक महिन्यापासून नळातून गढूळ व दूषित पाणी येत आहे. गढूळ पाणीपुरवठा ग्रामपंचायत मार्फत होत असून सुद्धा याकडे सरपंच व ग्रामसेवक पाणी पुरवठा कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत आहे. गावातील पाण्याचे टाकीत ब्लिचिंग पावडरचा नियमीत उपयोग केला जात नाही कारण तेथे वर चढण्यासाठी असलेल्या शिढ्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे यावर अजूनपर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नाही, असा आरोप गावातील नागरिकानी केला आहे. शुद्ध पाणी येत नसल्याने साथीचे रोग पसरु शकतात डेंग्यू, हिवताप असे विविध रोग होऊ शकतात. रस्ते साफ सफाई, बुजलेल्या नाल्या दुरूस्ती कराव्या, जेणेकरून पाणी साचून राहणार नाही. गावात जंतुनाशक फवारणी करावी. जेणेकरून साथीचे रोग होणार नाही. तसेच गावातील सर्व नळांचे वॉल लिकेज व कित्येक ठिकाणी वॉल मध्ये नाल्यांचे पाणी साचत आहे वॉल मध्ये कुत्रे पाणी पितात, उघड्या वर संडासला जाणारे त्या वॉल मधले पाणी वापरतात. त्यावर कुठल्याही प्रकारचे झाकणं बसवलेली नाहीत नागरिकांनी विचारणा केल्यास गमतीचा विषय म्हणून दुर्लक्ष केले जाते सर्वप्रथम ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मोरगाव भाकरे येथील नागरिक करीत आहे.यावर काही प्रतिक्रिया न झाल्यास विदर्भ आंदोलन समिती बाळापूर तालुका अध्यक्ष गणेश विठ्ठल भाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.