योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी ला लागून असलेल्या आणि नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथे गावाच्या विकासासाठी विविध विकास कामाचे भूमिपूजन नेरी -सिरपूर जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ मामीडवार यांच्या हस्ते दि 29 आगस्टला संपन्न झाले. खांबाडा या गावाच्या विकासासाठी मनोज मामीडवार यांनी पुढाकार घेतला असून जिल्हा परिषद च्या विविध विकास निधीतून या गावाला निधी उपलब्ध करून देऊन दि29 आगस्टला गावातील तीन सिमेंट रस्त्याचे डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक सौदर्यीकरणं आणि जि प शाळेची वर्ग खोली या मंजूर कामाचे भूमिपूजन करून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या विकास कामांमुळे गावाचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार असून गावातील जनजीवन सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे. या तिन्ही कामाचे भूमिपूजन सोहळा मनोजभाऊ मामिडवार यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी खांबाडा येथील सरपंच काजलताई ननावरे, उपसरपंच मंगेशभाऊ धाडसे, सदस्य गण अमोल गजभे रामभाऊ चौखे, सुनील कडवे, सुंनदाताई खाटे, शामलता ननावरे, दुर्गाबाई चौखे, वंदना बावणे आणि गावकरी उपस्थित होते.