गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगाव जा. : स्थानिक जळगाव जामोद शहरातील सुनगाव रोड वरील निळकंठेश्वर नगरमधील रहिवासी गोपाल वानखेडे यांच्या घरासमोर एक स्त्री जातीचे नवजात अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर टाली मध्ये आणून टाकून निघून गेले तेथील च आज काही नागरिकांना आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान ट्रॉलीमध्ये बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला त्यामुळे नागरिकांनी टाली मध्ये जाऊन पाहिले असता स्त्री जातीचे जिवंत अर्भक दिसून आले येथील नागरिकांनी त्या क्षणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती देतात जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे हेच कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक राजीव बुटे हे घटनास्थळावर पोहोचले त्यांनी येथील नागरिकांच्या मदतीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत या नवजात जिवंत स्त्रि अर्भकास ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले सदर घटनेची फिर्याद अरुण तुकाराम खिरोडकार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपरांत नंबर 705 कलम 317 भारतीय दंड विधान नुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस व ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य अधिकारी कर्मचारी तसेच गावकर्यांच्या मदतीने नवजात स्त्री अर्भकाचे प्राण वाचले पोलीस व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यतत्पर त्यामुळे त्या नवजात अर्भकाचे प्राणी असल्यामुळे जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक राजिव बुटे वआरोग्य अधिकारी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्या अर्भकास जळगाव जामोद पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे योगेश निंबोळकार अनील बुले हे करीत आहेत