महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.27:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईचे संघटक संजय भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावती तर्फे तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा निंबाळा(घोट) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म.रा.मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय भोयर, आयुध निर्माणी केंद्राच्या केंद्र प्रमुख विद्या मोघे, म.रा.मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, सदस्य ईश्वर शर्मा, पवन शिवणकर, महेश निमसटकर, प्रदीप मडावी प्रभृती मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन या लेखन साहित्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शिक्षिका कु.संगिता धकाते यांनी केले.तर आभार मुख्याध्यापिका माया माकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे सदस्य, मुख्याध्यापिका माकोडे, शिक्षिका धकाते आणि मदतनिस भारती कोडापे यांनी सहकार्य केले.