गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक : येथील महत्मा गांधी रोड वरील राहुल ट्रेडर्स संगणक विक्रीच्या दुकानाला अचानक आग लागली त्यामध्ये सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महात्मा गांधी रोड वरील रेड क्रॉस सिग्नलजवळ असलेल्या संगणक विक्री साहित्याचे राहुल ट्रेडर्स या नावाने दुकान आहे सरस्वती शाळेच्या इमारतीमध्ये असलेल्या या दुकानाला आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दुकानात लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवळजवळ आठ ते दहा गाड्या या ठिकाणी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले ही आग त्यानंतर आटोक्यात आली.या आगीमध्ये सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे


