गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा शहरात श्रावण महिन्यात शिवभक्त मंडळांच्या वतीने पूर्णा नदीवरून कावळद्वारे पाणी आणून भगवान शिवशंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील वर्षापासून बंद आहे. परंतु आज रोजी कोरोणा संक्रमणाची गती मंदावल्यामुळे शासनाने धार्मिक ठिकाणे वगळता इतर सर्व व्यवसायांना परवानगी दिली आहे. विशेषतः मंदिरे बंद ठेवून दारूच्या दुकानांना चालू ठेवण्याची तसेच लग्न समारंभ बंद ठेवून निवडणुकांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही कावळ यात्रा करण्याचे ठरविले असून आमच्या धार्मिक भावना आणि आस्था लक्षात घेता आम्हाला कावळ शोभायात्रेची परवानगी देऊन आमच्या आनंदात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन शिवभक्त मंडळ तेल्हारा वासीयांच्यावतीने तहसीलदार तेल्हारा,पोलीस स्टेशन ठाणेदार,पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिनांक 18 ऑगस्ट2021 रोजी देण्यात आलेले आहे. सदर निवेदनावर गजानन गायकवाड ,सुनील खारोडे,मनोहर चितलांगे, यश अवचार, गणेश इंगोले, सचिन थाटे,राम वाकोडे, अशोक गव्हाळे, रवींद्र शर्मा यांच्या स्वाक्षर्या आहेत.


