अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर :- हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त खानापूर रोड, पातूर येथील डॉ.शांतीलाल चव्हाण यांच्या श्री सेवा क्लिनिकमध्ये भव्य मोफत अस्थीरोग व हाडांची ठिसुलता तपासणी शिबीर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा भास्कर काळे हे होते तर डॉ गौरव मुंदडा, डॉ शांतीलाल चव्हाण, डॉ रामकृष्ण डोंगरे आदींची प्रामुख्याने उपस्थित होती. शिबीराचे उदघाटन तहसीलदार दिपक बाजाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ मिराबाई डोंगरे बहुउद्देशीय क्रीडा व शिक्षण संस्था, शिवणी द्वारा संचालित संत गाडगेबाबा फिरते व्यसनमुक्ती केंद्र अकोला यांच्या वतीने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शिबीरामध्ये परिसरातील गरजू रुग्णांची तपासणी अकोला येथील सुपरिचित अस्थीरोग तज्ञ डॉ गौरव मुंदडा यांनी करून वाहिली वसंतराव नाईक साहेबांना आदरांजली कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मनोज बांगर, वैभव जाधव,देवेंद्र हिवराळे,कुणाला उंडाळ,प्रशांत इंगळे, विशाल राठोड, आशिष पवार, संदीप राठोड, महेश उंडाळ, सुरज जाधव, राज राठोड आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.संचलन सुरज जाधव यांनी केले तर आभार रामगोपाल जाधव यांनी मानले.