गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून दिनांक ६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले याप्रकरणी आरोपी अभिजित आमले यास जळगाव जामोद पोलिसांनी पथक नेमले तेव्हापासून २४ तासातच मध्यप्रदेशातील रतलाम येथे जाऊन केली आरोपीस अटक. तांत्रिक माहितीच्या आधारे सदर आरोपी ची माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली असता, पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया साहेब,एस डी पी ओ.श्री कोळी साहेब तसेच एडिशनल एसपी श्री राजपूत साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे साहेब यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले होते कोणालाही या पथका विषयी माहिती देण्यात आली नव्हती या पथकाचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे तसेच पोलीस नाईक अनिल सुशिर, महिला पोलीस नाईक दीपमाला वानखडे आणि पोलीस शिपाई अमोल वनारे यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. दिनांक १७ ऑगस्ट रोजी एका खाजगी वाहनाने हे पथक मध्यप्रदेशातील रतलाम येथे रवाना झाले. यादरम्यान पथकाला पोलीस नाईक गणेश पाटील यांच्या मोलाच्या मदतीने व तांत्रिक माहिती च्या आधारे रतलाम मध्ये पोहोचल्यानंतर राजस्थान आणि मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या रतलाम जिल्ह्यातील बाजना या गावांमध्ये हे पथक पोहोचले तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथीलच संशयित व्यक्तीला पोलिसी खाक्या दाखवून आरोपी व पीडित मुलीगी राहण्याचे ठिकाण माहिती करून घेतले व पीएसआय सचिन वाकडे व सहकाऱ्यांनी आरोपी राहतो ते ठिकाण गाठले व तेथेच पीडिता अल्पवयीन मुलगी व आरोपीस त्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.तसेच आरोपी व पिडीतेला स्थानिक पोलिस स्टेशनला नेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करून मध्यप्रदेश पोलिसांनी दोघांनाही जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात दिले असता दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ४:३० वाजता हे पथक आरोपी व पीडितेला घेऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला पोहोचले. सदर आरोपी चा शोध जळगाव जामोद पोलिसांनी पथक नेमले तेव्हापासून २४ तासातच आरोपीला अटक केली.. तसेच जळगाव पोलिसांनी पीडित मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले व आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने दिनांक २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे सदर आरोपी वर कलम ३६६,३५४,ड,३७६(२)(J)(K)(N) भारतीय दंडविधान सह कलम ४,६,८,१२ पोस्को या कायद्यानुसार आरोपी अभिजीत रघुनंदन आमले वय २६ वर्षे राहणार पिंपळगाव काळे. याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी २४ तासांमध्येच मध्यप्रदेशात जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपीस बेड्या ठोकल्यामुळे व पीडित मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यामुळे जळगाव जामोद पोलीसांचे कौतुक होत आहे. सदर गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होतील त्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे व सचिन राजपूत हे करणार आहेत.