अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर :- दिनांक:-१८/०८/२०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे आगीखेड येथील विधवा महिला श्रीमती कांताबाई भारतशिंग तवर यांचे राहते घर रात्री.३:३० वा. संपुर्णत कोसळले असुन त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.या घटनेची माहिती आगिखेडचे कर्तव्यदक्ष तलाठी श्री. एम.पी.नाईक यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन स्थळ पाहणी केली व आगिखेड येथील सरपंच सौ. पूनमताई उगले व गावकरी पंच यांचे समक्ष पंचनामा करून अहवाल तयार केला.या अहवालाची दखल घेत पातूर तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. दीपक बाजड सर व मंडळ अधिकारी श्री. तानाजी सांगळे यांनी शासन निर्णया नुसार सदर कुटुंबास सानुग्रह मदत देण्यात आली.सानुग्रह मदत रुपये ५०००/- तलाठी श्री. एम.पी. नाईक व सरपंच,आगिखेड सौ.पूनमताई उगले यांचे हस्ते देण्यात आली. घटनेनंतर निराधार कुटुंबाचे तात्पुरते राहण्याची व्यवस्था आगिखेड गावातील सामाजिक सभागृहात करण्यात आली आहे.