राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना प्रबोधन..
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले श्रमदान.. युवकाचे प्राण वाचविणाऱ्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी गौरव श्रीनाथ यांचा सत्कार…
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची पुण्यतिथी…
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर (दि.१८ ॲागष्ट २०२१)-
स्थानीक डॉ. एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किरण खंडारे होते.याप्रसंगी विचारपीठावर डॅा. व्ही जी वसु, ग्रंथपाल प्रा. अतुल विखे, प्रा. दादाराव गायकवाड, प्रा. एच ए एकबोटे, डॅा. संजय खांदेल, डॅा अनिल देशमुख, डॅा दिपाली घोगरे, प्रा राहुल माहुरे, प्रा विजया साखरे,उपस्थित होते.सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. अरविंद भोंगळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना का? आणि कशासाठी याचे सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना ही सेवा करण्याचं ब्रीद आहे आणि आपण या कोरोना च्या महामारीतुन दोन लाटींमधुन संघर्ष करून बाहेर आलेलो आहोत. ज्याप्रमाणे या कोरोना काळात डॉक्टर,नर्सेस, सफाई कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांनी सेवा दिली तशाच प्रकारची सेवा महाविद्यालयासाठी आपण विद्यार्थी या नात्याने देणे गरजेचे आहे.या अनुषंगाने आपण आज महाविद्यालयासाठी श्रमदान करून राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद असलेल्या सेवा या ब्रीदवाक्याचा वापर केला पाहिजे.म्हणून उत्स्फूर्तपणे सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, वर्गखोल्या, व परिसर याची स्वच्छता केली. स्वयंस्फूर्तपणे श्रमदान करून आपलं महाविद्यालयातप्रति ऋण व्यक्त केले.यानंतर प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी विचार मांडले त्यांनी सांगितले की, नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कठोर असे प्रयत्न केले. संघर्ष आणि इंग्रजांशी लढुन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपली एक वेगळी छाप पाडली. विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या चरित्राचा अभ्सास करुन त्यामधून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावे असे मत यावेळी डॉ. किरण खंडारे यांनी व्यक्त केले.यानंतर पातुर घाटाच्या सानिध्यात वसलेल्या धोदाणी पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्या जवळील डोहात एक तरुण बुडत होता. त्याचा जीव महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी गौरव सुरेश श्रीनाथ याने आपल्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि त्या युवकाचे प्राण वाचविले. या कार्यामुळे महाविद्यालयाचे नाव संपुर्ण जिल्हयात उंचावले त्याबद्दल प्राचार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घेण्यात आला. कारण अशा प्रकारची हिंमत आणि धाडस दाखवुन एक आदर्श त्याने समाजासमोर मांडला. हा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगीतले.अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे उद्गार याप्रसंगी प्राचार्य किरण खंडारे यांनी काढले. यानंतर नव्यानेचं महाविद्यालय सुरू झालेले शारीरिक शिक्षण संचालक डॉ.अनिल देशमुख यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॅा. अनिल देशमुख यांनी केला. साहीत्य आणि खेळ यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस बॉईज युवक व विद्यार्थी आघाडी पातुर च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अर्जुनसिंह गहीलोत व अविनाश पोहरे यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरविंद भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दिपाली घोगरे यांनी केले कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.