महिलेच्या राहत्या घराचे छत कोसडले
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
दिनांक:-१८/०८/२०२१ रोजी च्या झालेल्या अतिवृष्टी मुळे आगीखेड येथील विधवा महिला श्रीमती कांताबाई भारतशिंग तवर रा. आगिखेड यांचे राहते घर रात्री.३.३०.वा.संपुर्ण कोसळले व कुटुंब उघड्यावर आले.याची माहिती आगिखेड कर्तव्यदक्ष तलाठी श्री. एम.पी.नाईक यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन स्थळ पाहणी करून आगिखेड येथील सरपंच सौ. पूनमताई उगले व गावकरी पंचा समक्ष पंचनामा करून अहवाल तयार केला. पातूर तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.दीपक बाजड सर व मंडळ अधिकारी श्री.तानाजी सांगळे सर यांनी शासन निर्णया नुसार तलाठी श्री. एम.पी.नाईक व सरपंच, आगिखेड सौ.पूनमताई उगले यांचे हस्ते रू.५०००/- सानुग्रह मदत देण्यात आली. व निराधार कुटुंबाचे वास्तव्य तात्पुरते स्वरूपात गावातील सामाजिक सभागृह, आगिखेड करण्यात आले.