सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा व पाण्याअभावी माना टाकणाऱ्या पिकांना जीवनदान देत तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले असून मंगळवारी मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत मेहकर तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे.
मंगळवारी भुर भुर पाऊस सुरू असुन धुक्याचे वातावरण दिवसभर निर्माण झाले होते त्यामुळे बळीराजा अडचणीत पडला होता बर्याच दिवसांपासून पिकावरील रोग व आळी औषध फवारणी करून आटोक्यात एत नसल्याने त्यात पुन्हा अडचण निर्माण होणार का? असे मनामध्ये निर्माण झाले . मंगळवारी मध्यरात्री 12 वा.पासून झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.