ग्राम पंचायतच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर- नागभीड तालुक्यातील ग्राम पंचायत वाढोणा येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायतीने स्व निधी मधून स्वतंत्र निर्माण केलेली व नवजात बालकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेली “वंदन शिशु सुरक्षा किट योजनेचा शुभारंभ व वितरणाचा कार्यक्रम” मनोहरजी चव्हाण तहसीलदार नागभिड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात डाँ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “वंदन शिशु सुरक्षा योजनेचा” शुभारंभ करण्यात आला सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे श्रीमंत व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्या नवजात बालकासाठी त्याच्या जन्मत: आवश्यक त्या सर्व वस्तू बाजारातुन विकत घेतात माञ गरिब कुटुंब आपल्या नवजात बालकाला ते उपलब्ध करुन देऊ शकत नाही. त्या जन्माला आलेल्या शिशुला व त्याच्या मातेला सुध्दा सदर सर्व वस्तु उपलब्ध व्हाव्यात व त्याचे आरोग्य सुदृढ राहावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्राम पंचायत वाढोणा चे सरपंच देवेंद्र गेडाम यांनी सदर योजना निर्माण करावी असा विषय ग्रामपंचायतच्या कमिटीसमोर विषय ठेवला व त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली त्यानुसार सदर योजना कार्यान्वित करण्याचे ठरवून तशी ग्राम पंचायत च्या अंदाजपत्रकात तरतूद करून व मासिक सभेत ठराव घेऊन सदर योजना निर्माण करण्यात आली. या किटमध्ये नवजात शिशु साठी बेबी सोप साबण, जॉन्सन बेबी पावडर, तेल, मच्छरदानी, चादर, न्यापकिन, ड्रेस, टावेल, तर बाळाच्या मातेसाठी टॉनिक बॉटल, व सँनेटरी प्याड व इतर वस्तु आहेत. सदर योजना पूर्णपणे मोफत आहे, ग्रामपंचायत वाढोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन्म होणाऱ्या व ग्राम पंचायत वाढोणा येथे जन्माची नोंद होणाऱ्या प्रत्येक नवजात शिशुला सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे, सदर योजचा 100% खर्च ग्राम पंचायत वाढोणा करणार आहे, ही योजना सर्व घटकातील शिशुंसाठी आहे, सदर योजना सन 2021 – 2022 या आर्थीक वर्षापासुन लागू होत आहे, असे प्रतिपादन सरपंच देवेंद्र गेडाम यांनी सदर योजने बाबत सांगितले. यावेळी महिला व बाल कल्याण विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे पंचायत समिती नागभीड यांनी सदर योजनेबाबत मार्गदर्शन केले व मातेने बाळाची व आपली काळजी कशापद्धतीने घ्यावी यावर प्रकाश टाकला सोबतच ग्रामपंचायतीने युनिसेफ संस्था ज्या पद्धतीने नवजात बालकासाठी कार्य करतात त्याच धर्तीवर सदरची योजना ग्रामपंचायतीने अमलात आणल्याचे प्रतिपादन केले. शासनाच्या बेबी किट योजनेपेक्षा कितीतरी पट्टीने उत्तम दर्जाची चांगल्या प्रकारचे साहित्य या किटमध्ये आहे. असे वक्तव्य केले. प्रमुख अतिथी डॉ. विनोद मडावी तालुका वैद्यकीय अधिकारी नागभीड यांनी या शुभारंभ प्रसंगी आधी किटमध्ये असलेल्या प्रत्येक साहित्याची पाहणी केली व बाळाच्या संगोपनाचा दर्जा लक्षात घेऊन बाळाच्या सुरक्षिततेसाठी हि किट प्रत्येक गोष्टीचा बारीक-सारीक विचार करून दर्जेदार किट निर्माण केली आहे. जेणेकरून बाळाच्या आरोग्याची काळजी घेताना मातेला कुठल्याही वस्तूची कमी पडणार नाही अशी कीट आहे. अशाप्रकारची नवजात बालकासाठी व मातेसाठी स्वतंत्र योजना निर्माण करणारी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत वाढोणा ही पहिली आहे. असे याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते किट वाटप करण्यात आल्या यावेळी निशा विभाकर उईके चिखलगाव, योगिता भोजराज गायकवाड सोनापूर तुकूम, रेखा विकास बोरकर वाढोणा, या नवजात शिशुच्या माता-पित्यांना कीट देण्यात आल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरजी चव्हाण तहसीलदार नागभीड यांनी सदर योजने बद्दल मार्गदर्शन करताना म्हणाले की मी अनेक ठिकाणी अनेक विभागात काम केले मात्र आज पावेतो कुठल्याही ग्रामपंचायतीने स्वतंत्र अशी योजना निर्माण केलेली नाही. सिमेंट रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, अंगणवाडी बांधकाम किंवा अन्य कुठलीही बांधकाम म्हणजेच गावाचा विकास अशी आज सर्वाची समज झालेली आहे. मात्र वाढोणा ग्राम पंचायतीने निर्माण केलेली योजना म्हणजेच जन्मजात बाळाला केलेले खऱ्या अर्थाने वंदनच आहे. हा संपुर्ण चंद्रपुर जिल्हासाठी अभिनव उपक्रमच आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्यामसुंदर पुरकाम पं. स. सदस्य नागभीड, प्रमुख अतिथी डॉ. विनोद मडावी तालुका वैद्यकीय अधिकारी नागभीड, राजेंद्र ठोंबरे महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी पं. स. नागभीड, देवेंद्र गेडाम सरपंच ग्रा.पं. वाढोणा, भगवान बनसोड उपसरपंच ग्रा.पं. वाढोणा, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरजी चव्हाण तहसीलदार नागभीड व अन्य मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र गेडाम सरपंच ग्रा.पं. वाढोणा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप येसंनसुरे ग्रा. पं. सदस्य यांनी केले तर आभार के. यु. वानखेडे ग्राम विकास अधिकारी ग्रा. पं. वाढोणा यांनी मानले. यावेळी ग्राम पंचायतचे सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्या, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर योजना फक्त वाढोणा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावापुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही वाढोणा ग्रा.पं. ला जन्म नोंद होणाऱ्या बालकासाठी लागू आहे. सरपंच देवेंद्र पी.गेडाम ग्रामपंचायतीने नवजात शिशु व मातेसाठी स्वतंत्र अशी योजना राबविणारी नावीन्य पूर्ण वाढोणा ग्रामपंचायत जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे.
मनोहरजी चव्हाण तहसिलदार नागभीड.











