योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील मौजा वलणी येते गादमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर श्री.बऱ्हाटे यांनी प्रत्यक्ष वलणी येथील चंद्रशेखर मारोती मेश्राम व नामदेव झोडे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकाची पाहणी केली.पाहणी अंती धान पिकावर गादमाशी प्रादुर्भाव आढळून आला. तसेच पिकांमध्ये खोडकीडा व पाने गुंडाळणारी अळी यांचाही प्रादुर्भाव दिसून आला. पिक पाहणीत आढळलेल्या किडीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. नागदेवते कार्यक्रम समन्वय KVK सिंदेवाही तसेच डॉ. ए. व्ही.कोल्हे सहयोगी संशोधन संचालक कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनी केले.तसेच सदर भेटीसोबत नागभीड उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. जाधव मंडळ कृषी अधिकारी तळोधी बा. अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी व वलणी येथील इतर शेतकरी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)