सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरविणे हा माझा छंद असून मी शेतकऱ्यांचे ५६० ग्रुप तयार करून व्हाटस् अप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाबद्दल माहिती देता, असे प्रतिपादन हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी देऊळगाव साकर्शा येथे सत्कार सन्मान सोहळ्यात केले.
तसेच शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या सोबत आलेल्या सहकार्याचे स्वागत करण्यात आले.
सरपंच संदीप अल्हाट, रतन दुगड, सुधाकर गायकवाड व अन्य प्रतिष्ठितांनी श्री. डख यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत अमोल नायकल, रामभाऊ डख, लक्ष्मण नायकल, कृष्णा मोरे, वेदांत डख यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील गजानन पाचपोर, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बोरचाटे, दिलीप नवत्रे, जीवन देशमुख, बाळू वानखेडे, रितेश दुगड, बुलडाणा अर्बनचे व्यवस्थापक . बऱ्हाटे आदी हजर होते. हा कार्यक्रम कास्तकार सुधाकर गायकवाड यांनी घेतला. यांच्या सह गावातील अनेक सन्माननीय नागरिक आणि गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुंडे यांनी केले. आभार . चवरे यांनी मानले.