अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
कोरोना काळातील अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या कर्तव्य प्रति एकनिष्ठ राहून दिलेल्या योगदानाबद्दल माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने दैनिक मातृभूमीचे पातुर तालुका प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे लातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून पत्रकार देवानंद गहिले यांना सन्मानपत्र आणि एक लाखाचा विमा कवच प्रदान करून त्यांचा सत्कार बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या हस्ते करण्यात आला आहे
या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा अंधारे प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे सभागृहामध्ये करण्यात आले होते
या कार्यक्रमाला पातुर चे तहसीलदार दीपक बाजड शहीद कैलास निंमकंडे स्मारक समितीचे अध्यक्ष वीर पिता काशिरामजी निमकंडे ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणराव अंधारे, सुषमा पाटील ,डॉ. सपनाताई राऊत, रामा अमानकर, देशपांडे मॅडम, विनायक वसंतकर , सुधाकर गव्हाळे ,दीपक इंगळे, विजय ताले, राजू मोकळकर, महादेव दुतोंडे ,पुरुषोत्तम ताले, यांच्यासह पत्रकार बांधवांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती मॅडम यांनी केले होते