गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-कोरोणाची दुसरी लाट ओसरली असून जनतेमध्ये कोरोनाची भीती आता नाहीशी व्हायला लागली आहे. मात्र कोरोणा संकट अजूनही टळलेले नाही. परंतु कोरोणा महामारीला हरविण्यासाठी आता एकच शस्त्र आहे ते म्हणजे लसीकरण. परंतु अद्यापही काही नागरिक असे आहेत ज्यांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतलेला नाही, त्यासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाने जनतेला आव्हान केले आहे की या कोरोना महामारी पासून वाचायला आता फक्त एकच पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे लसीकरण!! आपण उत्कृष्टपणे लसीकरणारा सहकार्य करावे.व आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यावी. आपल्या घरातील वयोवृद्ध माणसे, 18 वर्षावरील तरुण जे पण कोणी लसीकरणाचे राहिले आहेत.त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व या महामारी सोबत दोन हात करावे.असे आवाहन ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ. अशोक तापडिया यांनी केले आहे.