पातूर येथे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघांची वार्षिक आमसभा उत्साहात
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : सध्या सोशल मीडिया हे माध्यम सामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून अनेकांची प्रतिभा जगासमोर येत आहे. अशा माध्यमाचा वापर करीत अनेकजण चांगली युट्यूब चॅनेल व पोर्टल चालवीत आहेत. त्यांनी आपला दर्जा कायम ठेवत समाजात चांगली पत्रकारिता करीत असल्याचे दाखवून दिले आहे. अशा सोशल मीडिया ला सरकारने नियमावली लावून त्यांना मान्यता दिली पाहिजे, तसेच शासनाने पत्रकारांसाठी जाहीर केलेल्या पेन्शन योजनेत खऱ्या ग्रामीण पत्रकारांना समाविष्ट करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना शासनासोबत भांडत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी रविवारी केले. पातूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वार्षिक आमसभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची वार्षिक आमसभा पातूर येथे दि. १५ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली.पातुर वाशिम रोड वर स्थित पातूर पर्यटन केंद्र या निसर्गरम्य ठिकाणी ही वार्षिक आम सभा 15 ऑगस्ट रोजी पार पडली. या आमसभेला अध्यक्ष म्हणून बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश सरचिटणीस ऍड. सुधाकर खुमकर, विभागीय अध्यक्ष विठ्ठलराव महल्ले, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, जिल्हा कार्याध्यक्ष नीरज अवांडेकर ,जिल्हा सरचिटणीस जावेद जकारिया , कोषाध्यक्ष संजय कुडूपले, जेष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.आमसभेचे प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केले. यानंतर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस ऍड. सुधाकर खुमकर यांनी मार्गदर्शनपर भाषणे केले.पत्रकारांच्या अनेक महत्वपूर्ण मागण्यासाठी बहुजन पत्रकार संघ पाठपुरावा करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. आमसभेत तीन ठराव मांडण्यात आले. या ठरावाचे वाचन नीरज अवांडेकर यांनी केले. सोशल मीडिया माध्यमांसाठी सरकारने नियमावली जाहीर करावी, त्यांना मान्यता द्यावी, शासकीय अधिस्विकृती समित्यांचे गठन आगामी दोन महिन्यात करण्यात यावेत, तसेच खर्या ग्रामीण पत्रकारांना पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात यावे,आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यानंतर कोरोना काळात 2200 लोकांचे अंत्यसंस्कार करणारे जावेद जकारिया, तन्वीर खान, समीर खान, जावेद खान,वसीम खान, महफूज खान, सय्यद नदीम, सफदर अली, सय्यद एजाज, अरबाज खान तसेच पातूर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दुलेखान युसूफखा, वनविभागात उत्कृष्ट कार्य करणारे वनरक्षक अविनाश घुगे त्याचप्रमाणे तेल्हारा तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार दीपिका मुराई व पातूर तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार म्हणून संगीता इंगळे आदींचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आमसभेचे संचालन स्वप्नील सुरवाडे यांनी केले. आमसभेमध्ये वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यांनतर पातुर तालुक्याची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये पातूर तालुका अध्यक्ष म्हणून निशांत गवई यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली . तसेच तालुका उपाध्यक्ष स्वप्निल सुरवाडे, सचिव राहुल सोनोने, सहसचिव शंकर देशमुख, कोषाध्यक्ष मो. फरहान, प्रसिद्धी प्रमुख अविनाश गवई सदस्य म्हणून रमेश देवकर, जयंत अंभोरे, राहुल इंगळे, रामेश्वर वाढी, डॉ प्रविण कावल तर मार्गदर्शक म्हणून गोपाल गाडगे आदींची नियुक्ती करण्यात आली. आमसभेनंतर वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद घेत पातुरच्या निसर्ग पर्यटन केंद्रात जिल्ह्यातील पत्रकारांनी निसर्ग भ्रमतीचा मनमुराद आनंद घेतला.या वार्षिक आमसभेला अब्दुल कुद्दुस, मोहन जोशी, उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे, सतीश सरोदे, राजाराम देवकर ,कपिल पोहरे, परशराम देवकर, श्रीकृष्ण शेगोकार, सतीश कांबळे ,संगीता इंगळे ,प्रवीण दांडगे, प्रभुदास बोंबटकार , अजिंक्य निमकडे, निखिल इंगळे, सचिन बायस,भावेश गीरोळकार, बजरंग बुजबटराव ,शुभम पोहरे, अविनाश पाटील, संतोष लसनकार, शंकर जोगी, संदीप देशमुख, संदीप देशमुख,बाळापूर तालुकाध्यक्ष संतोष काळे, देवानंद साबळे, ज्ञानेश्वर शेंडे, आकाराम तेलगोटे ,सुभाष अग्रवाल, श्रीकृष्ण माळी, रवींद्र भटकर, डॉ. शेख चांद, भानुदास पातोडे, उमेश मसणे,अकोला तालुकाध्यक्ष प्रमोद मुरूमकर, देवानंद ढोरे, बाळासाहेब ठाकरे, संजय मांजरे, पद्माकर लांडे, अमोल बडे , विष्णुदास चोरे , सिद्धार्थ वाहुरवाघ, नसीबखा पठाण, दीपक लहाने ,तेल्हारा तालुक्यातून गणेश उमाळे, धम्मपाल बोदडे, ज्ञानेश्वर बाळकर, संघपाल गवारगुरु, सुनील धुरडे, रक्षित बोदडे, शुभम सोनटक्के, गोकुळ हिंगणकर, संदीपसिंह सोळंके, दीपक दारोकार, रवींद्र ठाकरे ,अनिल भाकरे, गुरुदेव वीसमोरे, सागर खराटे, दीपिका मुराई, विजय राऊत आदींसह जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.


