किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने जिल्हातील सामाजिक सेवाभावी संस्थेने केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर दरवर्षी एका संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. त्यामध्ये पातुर येथील सेवाभावी कार्य करणारे स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातुर चे संस्थापक ना.मो.राखोंडे गुरुजी यांनी सन २०१२ मध्ये प्रतिष्ठाणाची स्थापना करून पातुर शहरात व जिल्हातील ग्रामीण भागामध्ये सामाजिक कार्य चालु करून विविध अभिनव उपक्रम राबविले त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एच.आय.व्ही. एड्स व टी.बी क्षयरोग, गुप्तरोग इत्यादी रोगाबाबत माहिती देऊन त्यावर उपाययोजनेची माहिती हि लोकजागृती करून व त्याच बरोबर शासनाच्या विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनेची माहिती ग्रामिण गरजु लोकांना होण्याकरिता वॉलपेंटिंग, बॅनर फ्लॅक्स, सामाजिक देखावे, कार्यशाळा, प्रशिक्षण, वृक्षारोपन व सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला व पथनाट्याव्दारे अकोला जिल्हातील ७२ ग्रामीण भागामध्ये जनजागृती कार्यक्रम केले असून करत आहे. तसेच प्रतिष्ठाणाचे विशेष कार्य की गणेशोत्सवा मध्ये सामाजिक देखावे सादर करुन थोर महात्मेच्या जयंती व शताब्दी वर्षी निमित्य देखावे करून त्यांच्या जिवनकार्याची माहिती व्हावी या उपक्रमाची माहिती व दखल हे महाराष्ट्र शासनाच्या लोकमान्य महोत्सवा निमित्य गणेशोत्सव सजावट स्पर्धा सन.२०१६ मध्ये तालुका व जिल्हा पुरस्कार प्राप्त करून केलेल्या कार्यावर कौतुकाची थाप घेत मिळालेल्या पुरस्काराची रोक रक्कम ही सन.२०२० सामाजिक व युवा विकास कार्यासाठी खर्च केली व कोविड.१९ बाबत लोकजागृती करत शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात विशेष सहभाग घेऊन पातुरच्या कोरोना योद्धांचा सत्कार करून सामाजिक व सांस्कृतिक आणि विविध कार्य प्रतिष्ठाणाव्दारे करत आहे. यासर्व कार्याची दखल घेऊन यावर्षीचा देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार सन.२०२० – २०२१ करिता प्रतिष्ठाणाची निवड करुन सदर पुरस्कार हा दि.१५ ऑगष्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित भारत देशाचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यदिनाचा सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातूरचे अध्यक्ष सागर राखोंडे व मार्गदर्शक युवाश्री विशाल राखोंडे, शाहीर प्रकाश इंगोले,पल्लवी मांडवगणे, सागर पदमने, शुभांगी उमाळे या पदाधिकारी यांना सन्मान चिन्ह, गौरव पत्र व पन्नास हजारांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला मा.जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषद मुख्याधिकारी सौरप कटीयार, आमदार अमोलभाऊ मिटकरी, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठाणाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.