सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर दि.१५ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महा आवास अभियानअंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मेहकर पंचायत समिती ला प्रथम पुरस्कार मिळाला आहे यानिमित्त महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, मुंबई यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज बुलढाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मेहकर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती सौ.नीताताई दिलीपराव देशमुख व गटविकास अधिकारी आशिष पवार यांना प्रमाणपत्र,ट्राँफि देऊन गौरविण्यात आले यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार, शिवसेना आमदार संजय गायकवाड, जि.प.उपाध्यक्षा सौ.कमलताई बुधवत ,जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते,पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया सह मान्यवर उपस्थित होते. मेहकर तालुका अंतर्गत प्रधान मंत्री आवास योजनेचे प्रपत्र ब मधील 1395 लाभार्थीना 100% घरकुले मंजूर करण्यात आले असून आज पावेतो 1016 लाभार्थ्याचे घरकुले शौचालयासह बांधकाम पूर्ण झाले असून 379 घरकुले प्रगतीत आहेत तसेच राज्य पुरुस्कृत योजना मध्ये 1253 घरकुले मंजूर असून आज पावेतो 992 घरकुले पूर्ण असून 261 घरकुले बांधकाम प्रगतीत आहेत.तालुक्यातील जागा नसलेल्या एकूण 441 लाभार्थीना पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थ सहाय्य योजना आणि नियनामुकुल करून जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. सर्व घरकूल योजने अंतर्गत जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल योजना तसेच अतिक्रमण नियमनुकूल करून देऊन 100% मंजुरी तसेच घरकूल पूर्ण करण्यात मेहकरपंचायत समिती प्रथम आहे. यासाठी अभियान कालावधीत सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तसेच ग्रामीण गृह अभियंता ,यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, प्रकल्प संचालक श्री चोपडे तसेच गटविकास अधिकारी आशिष पवार यांचे मार्गदर्शनात घरकूल लाभार्थी ना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांचेकडून घरकूल पूर्ण करुण घेतली . जागा नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना दीनदयाल योजनेत तसेच अतिक्रमण नियमनुकूल करून जागा उपलब्ध करून दिल्या .यामुळेच अभियानाला गती प्राप्त होऊन सर्वांसाठी घरे ही योजना प्रत्यक्षात आणली गेली आहे