गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी यांच्या वतीने तेल्हारा तालुक्यामध्ये स्वच्छता पंधरवाडा व कोविड १९ जनजागृती चे आयोजन केले होते त्यानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे व आजादी का अमृत महोत्सव चे औचित्य साधून तेल्हारा तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रगान चा कार्यक्रम आटोपल्या नंतर स्वच्छता शपथ व वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंटी राऊत यांनी केले तर स्वच्छता शपथ वाचन तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांनी केले शपथ वाचनानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार व तहसील कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार सुरडकर, नायब तहसीलदार राजेश गुरव, मनोज सपकाळ, विलास टोलमारे. भारती गिरे,रोहिना अली, गणेश इंगळे, भूषण दाळू मंगेश गील्ले प्रशांत गदरे, माधुरी उगले, ज्ञानेश्वर पोहरे. राजेश बंड, रतन तायडे. प्रफुल हिंगणकर, गणेश वानखडे, विनोद अढावू ,अनंता गोटकळे, सागर शिरसागर, योगेश हिंगणे, सुनील सोळंके,नंदकुमार पचांग,कुलदीपसिंग ठाकूर,नंदकुमार मांडवे,अंकुश मानकर, शिलानंद तेलगोटे,श्री डाबेराव, बलदेवराव तायडे, मानेकाका, शुभम राऊत, श्याम जामोदे, व सर्व कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले


