पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा : औसा तालुक्यातील लामजना गावानजीक आसलेल्या गोटेवाडी शेतशिवारातून दोन वृध्द महिला भगिनी ७ जुलै रोजी बेपत्ता झाल्या होत्या. बेपत्ता महिलेच्या मुलाने आई व मावशी बेपत्ता असल्याची फिर्याद ११ जुलै रोजी किल्लारी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस त्यांचा शोध घेत होते. तब्बल ३५ दिवसांनंतर या दोघी महिलांच्या मृतदेहाचे गाठोडे शेतावळच आसलेल्या शेततळ्यात पुरलेले आढळून आले. मृतदेहाच्या गाठोड्यावर एक मृत गाय दफन करण्यात आली आहे. पोलिस गुरुवारी दि १२ आँगस्ट रोजी या शेततळ्यातील पाणी काढून हे मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलिस करीत होते.शेवंताबाई ज्योतीबा सावळकर वय ८२ रा.लामजना, त्रीवेणाबाई सगन सोनवणे वय ८५ रा लामजना या लामजना घरी राहाण्याऐवजी गोटेवाडी शिवारातील स्वत:चे शेत सर्वे न.५ येथे राहात होत्या. या दोघीच्या जमीनी जवळच होत्या. त्यामुळे त्या दिवसभार शेतात काम करुन रात्री एकत्र शेतातील घरात राहात होत्या. ७ जुलैपासुन गायब झाल्या. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते त्यामुळे अपहरण झाल्याचे मृत त्रीवेणीबाई सोनवणे यांचा मुलगा नवनानाथ सोणवणे याने किल्लारी पोलीस ठाण्यात आई व मावशी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. या घटनेत त्या रहात असलेल्या घराची अवस्था पाहून संशय आला. शेवंताबाई सावळकर हिची मुलगी अरोपी राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर रा.लामजना यास दिली होती परंतु जावयाची वर्तणूक बरोबर नसल्याने तिची जमीन मुलगा नसल्यामुळे तिच्या मुलीच्या म्हणजे आरोपीच्या पत्नीच्या नावावर केली होती. त्यामुळे सासुवर राग यातून आरोपी जावयाने सावळकर यांना कोयत्याने वार करुन जिवंत मारले हे मारत आसताना बहीण त्रीवेणी विचारणा केली असता तिलाही पुरावा नष्ट करण्यासाठी जिवे मारले. या दोघींच्या प्रेताचे तुकडे करुन पोत्यात भरुन शेततळ्यातील पाळूच्या खपारीत पुरले व शंका येऊ नये म्हणून गाईची हत्याकरुन पे्रेतावर पुरलेया प्रकरणी किल्लारीचे सपोनी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली पीएसआय अमोल गुंडे,बिटजमादार सचीन उस्तुर्गे,पोका अबा ईंगळे यानी अरोपीच्या शोधात मंबई ,पुणे ठिकाणी चकरा मारल्या पण शेवटची चक्कर कामी येऊन घाटकोपर मंबई येथे त्यास अटक करण्यात आले. पोलीसानी आपल्ला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल करुन दोघीना व गाईला मारुन कुठे पुरले याची माहिती दिली पोलिसानी बुधवारपासून जिसीबीच्या साह्याने उकरण्यास सुरू केले तळ्यात पाणी आसल्यामुळे पोलीसाना बिटजमादार सचीन उस्तुर्गे व पोका अबा ईंगळे पोका दत्ता गायकवाड यानी रात्र जागून काढली. गुरुवारी त्यांचे मृतदेह बाहेर निघाले दुपारी २ वाजता लामजना रुग्णालयाचे डॉ सानप अभिषेक यानी शवविच्छेदन केले. पोलीस आधीक्षक निखील पिंगळे, वरिष्ट अधिकारी नवले यानी घटनेची उकल झाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस सपोनि सुनिल गायकवाड यांनी दिली.


