अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातुर घाटाच्या सानिध्यात वसलेल्या धोधानी निसर्ग पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्या जवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक तरुण बुडत होता. बुडणाऱ्या युवकाने सर्व कडे मदतीची अपेक्षा केली होती परंतु तेथील उपस्थितीत असलेल्या त्या तरुणाच्या मित्रांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्या वेळी च बाजूला झाडा खाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ याने तिथ जाऊन बघितले. तेव्हा त्याने हवेने भरलेले टयुब युवकाकडे फेकले परंतु सदर युवकाला ते पकडता आले नाही ते बघताच गौरव ने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि त्या युवकाचे प्राण वाचविले.
या कार्यामुळे गौरव ची तालुक्यात प्रशंसा होत आहे. असे बहादुर तरुणांची या देशाला गरज आहे. १५ ऑगस्ट च्या दिवशीच ३:३० वाजता या शौर्याची प्रचिती आली. आणि गौरवचा साधे पणा यातून दिसून येतो की ज्या तरुणाचे त्याने प्राण वाचविले त्याचे नाव सुद्धा त्याला माहिती नाही.


