किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
भारतीय लष्करातून निवृत्त होऊन आपल्या गावी परतलेल्या सैनिक श्री. श्रीराम दशरथ देवकर यांचे पातूर येथे जंग्गी स्वागत करण्यात आले श्रीराम दशरथ देवकर हे आपल्या छोट्याशा अंधारसांगवी या गावातून देश सेवा करण्याकरिता तब्बल 20 वर्षं गावा पासून व अपल्या परिवारा पासून दूर राहून भारतीय लष्करात (BSF नंतर CISF) मध्ये आपली सेवा एक निष्ठेने पूर्ण केली सैनिक श्रीराम दशरथ देवकर आपल्या गावी परत येत असताना पातूर येथील श्री. मुंसजी माऊली मित्र मंडळ च्या वतीने पातूर नगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच माजी सैनिक श्री. रवि श्रीनाथ (ARMY) यांचा सत्कार करण्यात आला आणि सध्यास्थीतीत भारतीय लष्करात आपली देश सेवा देत आहेत असे दोन भावंडे (१)विशाल कांबळे ( CRPF),(२) प्रवीण कांबळे (CRPF) यावेळी यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून हिदायत खा, रूम खा (इद्दु पैलवान) (माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक),प्रीतमजी खुळे(जेष्ठ मार्गदर्शक), प्रकाश डाखोरे सर,जनार्दन खुळे सर,प्रकाश चवरे सर, हरिदास गोदमले सर,सुहास भाऊ देवकर सर, गणेश देवकर, सुधाकर भाऊ शिंदे (सामाजिक कार्यकर्ते),कृष्णा भाऊ बोंबटकार (राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अद्यक्ष पातूर) अणिक भाऊ पटेल, सै.इरफान भाऊ(ग्रा.प.सदस्य),मंगेश भाऊ डोंगरे(ग्रा.प.सदस्य),सागर भाऊ इंगळे, सै.छोटू भाऊ, राहुल भाऊ वाघमारे, नंदू भाऊ देवकर, अजू भाऊ भोकरे, गोपाल भाऊ लोखंडे,दत्ता पांडे, धनराज शिंदे, सागर लठाड ,गोलू मेटांगे, आकाश करवते,संतोष गिर्हे, रवी लठाड ,एकनाथ लठाड,विनोद भाऊ शिंदे, रोशन डाखोरे, रामचंद्र लोखंडे, विलास धोंगळे हे उपस्थित होते.