निलेश किरतकार
मुख्य संपादक
अकोला : संपूर्ण भारतात 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला शहरातील संगीताशी नाळ जुळलेल्या प्रतिष्ठित नागरिकांचा समूह असलेल्या मेलोडीज ऑफ अकोला ह्या समूहाने भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्षगाठ देशभक्तीपर गीत गायन करून अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला शहरातील डॉक्टर्स, व्यापारी, सनदी लेखापाल, सरकारी अधिकारी, बिल्डर्स, अश्या संगीताची आवड असणाऱ्या प्रतिष्टीत लोकांनी एकत्र येऊन मेलोडीज ऑफ अकोला हा समूह तयार करून संगीता शिवाय अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले. ज्या मध्ये वृक्षारोपण, करोना काळात मास्क वाटप, राशन वाटप असे कार्यक्रम राबविले. ह्या सोबतच अकोलकर ह्यांचे मध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लागावी म्हणून स्थानिक इन्कम टॅक्स चौका जवळ सकाळी 7 ते 12 वा पर्यंत सतत मेलोडीज ऑफ अकोला चे सदस्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन व नाचून भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा दिन उत्साहात साजरा केला. ज्या मध्ये समूहाचे ऍडमिन CA मनोज चांडक व आरती लड्डा ह्यांनी बहारदार संचालन केले.
सरकारी अधिकारी ह्यांनी केले बहारदार गायन
ह्या प्रसंगी अकोल्याचे निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सदस्यांचा उत्साह वाढावा म्हणून स्वतः गायन करून कार्यक्रमात जान आणली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अग्रवाल, महेंद्र खेतानं, अजय सेंगर, संजय पिंपरकर अनिल सोनी, निधी मंत्री, राजेश पूर्वे, ब्रिजमोहन चितलंगे, डॉक्टर कऱ्हा ळे , जयप्रकाश राठी, व मेलोडीज ऑफ अकोल्याच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.