योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील तळोधी बा. वरून जवळ असलेला आकापूर येथील ग्राम पंचायत अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायत च्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ग्राम पंचायत आकापूर यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रमे वेळोवेळी राबवित असतात. यामधून नेहमी ग्राम पंचायत मार्फत गावातील नागरिकांना एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न ग्राम पंचायत करीत असते. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्याने ग्राम पंचायत आकापूर येथील सरपंच कुणाल गहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुणाल गहाणे सरपंच, जितेंद्र कोवे उपसरपंच, डी. एच.मेश्राम सचिव, गुरुदेव निकुरे सदस्य, दुर्गा चनफणे सदस्य, शालू आत्राम सदस्य, निता बोरकर सदस्य, अरुणा मडावी, उत्तम मडावी ग्रा.पं. कर्मचारी, विनोद भाकरे ग्रा.पं. कर्मचारी, ज्ञानेश्वर भाकरे ग्रा.पं. ऑपरेटर, व इतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते