सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हीवरा आश्रम कोरोना काळात अनेक संस्था समोर आलेल्या आपणांस दिसतात ज्यात टीम तरुणाई हे एक नाव.शिक्षण , आरोग्य,पर्यावरण सारख्या क्षेत्रात कार्यरत आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान भारत सरकार आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सुचविलेल्या ‘आर्सेनिक अल्बम 30 ’या होमिओपथिक औषधाची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.तेव्हा टीम तरुणाई,हिवरा आश्रमने पुढाकार घेत औषधीचे 5000 लोकांना व साखरखेर्डा पोलीस स्टेशन कर्मचारी यांना मोफत वाटप केले.एकेकाळी भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती देतांना रक्त वाहिले.त्यांचे ऋण फेडण्यासाठी हिवरा आश्रम येथील टीम तरुणाईतील युवकांनी पुढाकार घेत स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर पार पडले.या शिबिरात 18 रक्तदातेनी रक्तदान केले.या शिबिरात खास करून जिल्हा शासकीय रक्तपेढी, बुलढाणा यांना पाचारण करण्यात आले होते.आपण केलेल्या रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते.तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.त्यामुळे रक्तदान नेहमी करत रहा हा संदेश देण्यात आला.ग्रामीण रुग्णालयातील डॉ.धांडे व डॉ.सुसर यांनी सुद्धा सेवा व विशेष सहकार्य केले.या शिबिरात सरपंचपती नितीन इंगळे,युवासेना शाखा प्रमुख सचिन गिरी,भारतीय सैनिक नितीन इंगळे व इ परिसरातील नागरिकांनी सुद्धा सहभाग व उपस्थिती दर्शवली.