किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
ग्राम शिर्ला (अंधारे) ता पातुर जि अकोला येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयास प्रचार्य डॉ सत्यनारायण बाहेती राष्ट्रीय उपाध्यक्ष ग्रंथालय भारती आणि सौ. बाहेती त्यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवरील ६६ ग्रंथांची वाचनालयाला अमुल्य भेट दिली . सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष नारायण अंधारे यांनी त्यांचे स्वागत करून ‘कैवल्याचे लेणे’ या आपल्या कवितासंग्रहाची भेट दिली.रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे ह.भ.प. राजू महाराज कोकाटे मेजर इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ बाहेती यांनी मनोगतात सांगितले की ग्रंथ हेच माझे गुरु असून तो मला वडिलोपार्जित वारसा लाभला आहे. नारायण अंधारे यांनी ‘नदीकाठी माझा गाव’ ही ग्राम शिर्ला वरील कविता वाचून गावाचा परिचय दिल.यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये गुलाबराव कोकाटे, दामोदर अंधारे, रामकृष्ण खंडारे, डी. एस इंगळे, हरिभाऊ कठाळे, काशिनाथ ढाळे, महिला समितीच्या सह् सचिव सौ मीराताई राऊत अनंत अंधारे, गजानन ताले, श्रीकृष्ण रा. अंधारे यांची उपस्थिती होती. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.