मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त पोलीस स्टेशन हिवरखेडला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.यावेळी पोलीस स्टेशन हिवरखेडचे ठाणेदार धीरज चव्हाण,दुय्यम ठाणेदार गोपाल दातिर,विठ्ठल वाणी तसेच सर्व पोलीस अधिकारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचचे दिलीप लोणकर,श्रेयश लोणकर,प्रथमेश लोणकर,विनोद मोरखडे,शिवा ओंकारे,गोपाल सूंदरकर,मनोज भगत आदी उपस्थित होते.


